न्यूयॉर्कमध्ये आकर्षण ठरत आहे सोन्याचा कमोड

commod
न्यूयॉर्क – अमेरिकेतील एका संग्रहालयात ठेवण्यात आलेला सोन्याचा कमोड प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून अमेरिका असे नाव १८ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या या शौचालयास देण्यात आले आहे.

न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध सोलोमन आर. गुज्जेंहेम या संग्रहालयात हे शौचालय ठेवण्यात आले असून, याचे डिझाईन इटलीच्या कलाकाराने केले आहे. मौरिझिओ कॅट्टेलॅन असे या कलाकाराचे नाव आहे. संग्रहालयाच्या ५ व्या मजल्यावरील एका आराम खोलीत या शौचालयास ठेवले आहे. याची चमक आणि आकार प्रेक्षकांना खुणावणारा आहे, असे संग्रहालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शौचालयास खासगी पैसा जमा करण्यात आला असून काही नागरिकांनी भरीव रक्कम दिली आहे, असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. शुक्रवारी प्रेक्षकांना पाहण्यासाठी हे शौचालया खुले करण्यात आले आहे.

Leave a Comment