एअरटेल-जिओचे काही जमेना

airtel
मुंबई- नुकतीच रिलायन्सने एअरटेल आणि जिओमध्ये इंटरकनेक्शन कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढल्याची तक्रार केली होती. आम्ही नक्कीच कॉल ड्रॉपचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करू असे एअरटेलने म्हटले आहे.

रिलायन्सने एअरटेलच्या या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अद्यापही कॉलची गुणवत्ता सुधारली नसल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. जिओवरुन एअरटेलला कॉल गेल्यास किंवा आल्यास आवाज अस्पष्ट येतो आणि तो कॉल कट होतो असे जिओने म्हटले. जो प्रस्ताव एअरटेलने दिला आहे त्यानुसार केवळ एक चतुर्थांश इंटरकनेक्शनची क्षमता असल्याचे दिसते असे जिओने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. दोन्ही नेटवर्कमध्ये दररोज दोन कोटी कॉल कट होतात असे त्यांनी म्हटले आहे. दोन्हीकडच्या ग्राहकांचे समाधान व्हावे यासाठी एअरटेलने लवकरच पावले उचलावी असे जिओने म्हटले आहे. कॉल्सची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअरटेलने ९० दिवसांची मुदत मागितली आहे. ट्रायच्या नियमानुसार ९० दिवसांची मुदत देणे आम्हास बंधनकारक नाही असे जिओने म्हटले आहे. लवकरात लवकर गुणवत्ता सुधारण्यासाठी तयारीला लागा असे आदेशच ट्रायने एअरटेलला दिले आहेत.

Leave a Comment