नवी दिल्ली : आपली नवी डाटा ऑफर रिलायन्स जिओने लाँच केल्यानंतर सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या युक्त्या चालू केल्या असून आता त्यातच एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. आपल्या युजर्ससाठी एअरटेलने ५ जीबी मोफत ३ जी इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे.
एअरटेल ग्राहकांना मोफत देणार ५जीबी ३जी डाटा
आपल्या ग्राहकांसाठी नव्या डाटा प्लानची ऑफर बीएसएनएलने आणली. त्यानंतर आता एअरटेलने ही नवी ऑफर लाँच केली आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही ऑफर २ जी, ३ जी आणि ४ जी युजर्सना देखील मिळणार आहे. या नव्या ऑफरमध्ये मिळणा-या डाटा पॅकचा स्पीड युजर्सद्वारे सब्सक्राइब्ड डाटानुसारच मिळणार आहे. मात्र, या ऑफरचा सरसकट लाभ हा सर्व युजर्संना घेता येणार नाही. या एअरटेलच्या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिणा-या युजर्सकडे ‘माय एअरटेल ऍप’ असणे गरजेचे असणार आहे. हे नवे ऍप आयफोन आणि अँड्राइड युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.