उर्जित पटेलांच्या सहीची २० रू. नोट लवकरच

20ru
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे हस्ताक्षर असलेली २० रूपयांची नोट रिझर्व्ह बँक लवकरच चलनात आणणार आहे. पटेल यांनी ४ सप्टेंबरला रघुराम राजन यांच्याकडून गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

भारतीय चलनात १ रूपयाची नोट सोडता सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची सही असते. मात्र बँकेच्या इतिहासात दोन गर्व्हनरना चलनी नोटांवर सही करण्याची संधीच मिळालेली नाही. बँकेचे पाचवे गर्व्हनर म्हणून नियुक्त झालेले के.जी. अंबेगांवकर यांचा कार्यकाल होता १४ जानेवारी ५७ ते २८ जानेवारी ५७. म्हणजे अवघा कांही दिवसांचा. या काळात नवी नोट जारीच केली गेली नाही त्यामुळे त्यांची सही नोटेवर आली नाही. मात्र १ रूपयांच्या नोटा वित्तमंत्रालयाकडून आणल्या जातात त्यावर अर्थसचिवांची सही असते. अंबेगांवकर कांही काळ वित्त सचिव होते तेव्हा मात्र त्यांच्या सहीची १ रूपयाची नोट चलनात आली होती.

रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न आरकेल स्मिथ यांनी हे पद १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७ या काळात भूषविले होते मात्र त्या काळातही भारतीय चलनाची नोट जारी केली गेली नव्हती त्यामुळे त्यांचीही सही भारतीय चलनी नोटेवर येऊ शकली नव्हती.

Leave a Comment