एटीएमचा पिन नंबर बदला; बँकांची ग्राहकांना सुचना

atm
नवी दिल्ली – नुकतेच एटीएमसंदर्भात फसवणुकीच्या घटना आणि तक्रारी समोर आल्याने ग्राहकांना एटीएम पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी दिले आहेत. बँकांनी आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून आपला एटीएम पिन नंबर बदलण्याच्या सुचना दिल्या आहेत. बँकेने पाठविलेल्या एसएमएसमध्ये म्हटले आहे की, आपल्या डेबिट कार्डचा पिन नंबर सुरक्षेच्या कारणास्तव बदलणे गरजेचे आहे, कृपया तुमच्या एटीएमचा पासवर्ड लवकरात लवकर बदला.

कुठल्याही प्रकारची वैधता एटीएम कार्डच्या पिन नंबरची नसते त्यामुळे अनेक ग्राहक आपला पिन नंबर बदलत नाहीत. एटीएम पिन न नंबर बदलण्याचे कारण असेही आहे की, एटीएम ट्रान्झॅक्शन खुपच सुरक्षित जागेत केले जाते त्यामुळे बँकाही ग्राहकांना पिन नंबर बदलण्याची कुठलीही अट ठेवत नाहीत. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये अनेक नागरिकांसोबत एटीएम फ्रॉड झाल्याचे उघड झाले होते. गेल्या महिन्यात एका परदेशी नागरिकाला एटीएममध्ये संशयित डिव्हाइस लावण्याच्या आरोपात अटकही करण्यात आली होती.

Leave a Comment