सेडान इटिओसचे नवे अपडेटेड मॉडेल लाँच

toyota
नवी दिल्ली : आपली मध्यम आकाराची सेडान इटिओसचे नवे अपडेटेड मॉडेल जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टोयोटाने लाँच केले असून दिल्ली एक्स शोरूममध्ये या नव्या मॉडेलची किंमत ५.२४ लाखांपासून ८.८७ लाखांपर्यंत असणार आहे.

कंपनीकडून या नव्या कारमध्ये नवी ग्रील देण्यात आली असून या ग्रीलच्या माध्यमातून एअर इंटेक करण्यास मदत होणार आहे. कंपनीने या नव्या गाडीतील फोग लाइटस्मध्ये थोडा बदल केला आहे. या नव्या सेडानला कंपनीने प्लॅटिनम इटिऑस हे नाव दिले आहे. ही नवी कार पेट्रोल आणि डिझेल या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. इटिऑसच्या या पेट्रोल इंजिन असणा-या मॉडेलमध्ये १.५ लिटरचे इंजिन देण्यात आले आहे. या पेट्रोल इंजिन असणा-या कारची किंमत ६ लाख ४३ हजारांपासून ते ७ लाख ७४ हजारांपर्यंत असणार आहे. तसेच या डिझेल मॉडेलमध्ये १.४ लिटर इंजिन देण्यात आले आहेत. याची किंमत ६ लाख २८ हजारांपासून ते ७ लाख ४४ हजारांपर्यंत असणार आहे.

Leave a Comment