पुढच्या वर्षी लवकर येणार बाप्पा

ganpati
मुंबई – पुढील वर्षी ऑगस्टमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार असून यावेळी त्यांचा मुक्काम देखील वाढणार आहे. पुढील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होईल. तर, ५ सप्टेंबरला अनंतचर्तुदशी असेल. त्यामुळे गणेशोत्सव बारा दिवसांचा असणार आहे. तर गौरीचे आगमन पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवार २९ ऑगस्ट रोजी होणार असून गौरी गणपतीचे विजर्सन सातव्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टला होणार आहे. बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी ५ ऑक्टोबरला अनंतचर्तुदशी असेल.

आगामी वर्षात असे होणार बाप्पांचे आगमन –
२५ ऑगस्ट, २०१७
१३ सप्टेंबर, २०१८
२ सप्टेंबर, २०१९
२२ ऑगस्ट, २०२०
१० सप्टेंबर, २०२१
३१ ऑगस्ट , २०२२
१९ सप्टेंबर, २०२३
७ सप्टेंबर, २०२४
२७ ऑगस्ट, २०२५

1 thought on “पुढच्या वर्षी लवकर येणार बाप्पा”

  1. चुक दुरुस्त करा ५ ऑक्टोबरला अनंतचर्तुदशी नसून 5 सप्टेंबरला आहे.

Leave a Comment