डुकाटीने आणली नवी एक्सडेव्हिल बाइक

ducati
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली आकर्षक डिझाइन असणारी आणि सर्वोत्तम रायडिंग परफॉरमन्स देणारी एक्सडेव्हिल बाइक जगातील सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी डुकाटीने भारतामध्ये लाँच केली.

बेल्ट ड्राइव्ह टेक्नॉलॉजीचा समावेश या नव्या बाइकमध्ये करण्यात आला असून हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन ब्रँडच्या बाइकमध्ये साधारणपणे या इंजिनचा वापर समावेश करण्यात येत होता. आता या बाइकमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या बाइकमध्ये १२६२सीसी ४व्ही लिक्वीड-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ५००० rpm वर ९५ lb/ft चा टार्क जनरेट करु शकतो. या नव्या बाइकमधील मागील बाजूस एक छोटेसे सीट देण्यात आले असून, यामध्ये ऑल ब्लॅक व्हिलस्, फुल एलईडी हेडलाइटस्, ए.बी.एस टॅक्शन कंट्रोल, डे-टाइम रनिंग लाइट आणि रायडर इन्फोरमेशन सिस्टिम देण्यात आले आहेत. दिल्ली एक्स शोरुममध्ये एक्सडेव्हील मॉडेलची किंमत १५ लाख ८७ हजार रुपये तर एक्सडेव्हील एस मॉडेलची किंमत १८ लाख ४७ हजार रुपये असणार आहे.

Leave a Comment