कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेणार चेन्नईचा भिकारी

chennai
चेन्नई: चेन्नईमधील रस्त्यावर राहणा-या मुलाला चक्क कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळाली असून इच्छाशक्तीपुढे सगळे आकाश ठेंगणे असते असे दाखवणारी ही घटना सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

जयावेल या २२ वर्षांच्या तरुणाची ही प्रेरणादायी सत्य घटना आहे. मुळचा आंध्रप्रदेशमधल्या नेल्लोरचा राहणारा जयावेल कुटुंबाची शेती गेल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह चेन्नई शहरात आला. मात्र, येथेही काही हाती न आल्याने त्याला कुटुंबासोबत रस्त्यावरच दिवस काढावे लागले. रोजगार सहजासहजी न मिळाल्याने जयावेल रस्त्यावर भिका-यांसारखा भीक मागायचा आणि कुटुंबाचे पोट भरायचा. त्यातच वडिल गेल्याने आईची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली.

त्याने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही रस्त्यावर राहायचो. डोक्यावर छप्पर नव्हते. पाऊस आला की आम्ही सुरक्षित ठिकाणी धाव घ्यायचो. मग पोलिसवाला यायचा आणि आम्हाला हाकलावून द्यायचा त्यानंतर भरपावसात पुन्हा एकदा डोक लपवण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू व्हायचा. अशा परिस्थीतीतही त्याने परिस्थितीवर मात केली आहे. या तरूणाला इटलीच्या एका विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे आणि लवकरच उच्च शिक्षण घेण्यासाठी तो इटलीत जाणार आहे. त्याच्या आयुष्यात बदल तेव्हा घडला जेव्हा सुयम ट्रस्टचे उमा मुथ्थुरामन आणि त्यांचे पती जयावेलला भेटले.

सुयम ट्रस्टच्या उमा मुथ्थुरामन आणि त्यांचे पती हे चेन्नईतील रस्त्यावर राहणा-या मुलांचे पुर्नवसन करण्यासाठी धडपडत होते. त्यादरम्यान त्यांची भेट जयावेल यांच्यासोबत झाली. त्यांनी पुढे त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली. जयावलेने या संधीचे सोने केले. त्याने मन लावून अभ्यास केला. आता तो केंब्रिज विद्यापीठाच्या परिक्षेत तो यशस्वी झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तो आता इटलीला जाणार आहे.

Leave a Comment