अमेझॉनचे जेफ बेझोस जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती

bezos
ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक जेफ बेझोस यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तीन नंबरवर झेप घेतली असून त्याची संपत्ती ६५.८ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. फोर्ब्समध्ये ही माहिती दिली गेली आहे. हॅथवेच्या वॉरन बफेटला मागे टाकून बेझोस यांनी हे स्थान प्राप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मंगळवारी वेल्स फार्गोस संदर्भातल्या बनावट अकौंट प्रकरणामुळे बफेट यांना १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्यांची संपत्ती ६६ अब्ज डॉलर्सवर आली. याचवेळी अमेझॉनचे वाढलेले उत्पन्न व कंपनीच्या शेअर्सनी घेतलेली उसळी यामुळे बेझोस यांच्या संपत्तीत वाढ झाली. बेझोस यांच्याकडे अमेझॉनचे १८ टक्के शेअर्स आहेत.

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती आहे ७८ अब्ज डॉलर्स. दोन नंबरवर झारा चे संस्थापक अमान सिओ आर्टेगा हे आहेत व त्यांची संपत्ती आहे ७३.१ अब्ज डॉलर्स.

Leave a Comment