सॅमसंग गॅलक्सी ए९ प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

samsung
मुंबई: आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी ए ९ प्रो हा प्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने लॉन्च केला असून सॅमसंगच्या इतर महागड्या स्मार्टफोनप्रमाणे या स्मार्टफोनची किंमत ३२ हजार ४९० इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन २६ ऑक्टोबरापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. चीनमध्ये हा स्मार्टफोन मार्च महिन्याआधी लॉन्च करण्यात आला होता.

भारतासह जगभरात सॅमसंग या कंपनीच्या स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनने अ‍ॅपलच्या आयफोनलाही मोठी टक्कर दिल्याने आयफोनच्या किंमतीत घट झाली होती. त्यामुळे कंपनी मोठ्या विचारात पडली होती. त्यामुळे त्यांनी आयफोन ७ वर सर्व भीस्त ठेवली आहे.

हा स्मार्टफोन गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगचे याआधीचे सर्वच स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस पडल्यामुळे आता हा नवा गॅलक्सी ए ९ प्रो ग्राहकांच्या किती पसंतीस पडतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कारण पुढील महिन्यात ७ ऑक्टोबरला अ‍ॅप्पलचा आयफोन ७ हा भारतात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या खपात वाढ होईल की घट हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment