सर्वसामन्यांना परवडणारी महिंद्राची नवी बोलेरो पॉवर प्लस

mahindra
नवी दिल्ली : आपली नवी बोलेरो पॉवर प्लस नुकतीच भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने लाँच केली असून दिल्ली एक्स-शोरूममध्ये या नव्या बोलेरोची किंमत ६ लाख ५९ हजार रूपये असणार आहे. ही नवी बोलेरो ३ ट्रीममध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

१४९३ cc mHawk इंजिन या नव्या महिंद्रा बोलेरो पॉवर प्लसमध्ये देण्यात आले असून ७० बीएचपीचा पॉवर आणि १९५ एनएम टार्क जनरेट करता येऊ शकतो. याबाबत महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट आणि ऑटोमोटिव्ह एक्झिक्युटिव्ह प्रविण शहा यांनी सांगितले, की मागील दहा वर्षांपासून महिंद्रा बोलेरो भारताची नंबर एकची एसयूव्ही आहे. या नव्या कारच्या माध्यमातून महिंद्रा आपले नाव आणि ओळख सामान्यांपर्यंत मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीला विश्वास आहे की ही नवी बोलेरो पॉवर प्लस ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरू शकेल.

Leave a Comment