या मंदिरात जाण्यासाठी पुरूषांना देखील करावा लागतो नट्टापट्टा

crossdresser
मंदिरांमध्ये पूर्जा-अर्चना करण्यासाठी हिंदू मान्यतांनुसार वेगवेगळे नियम असून देशातील अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशबंदी आहे तर काही मंदिर असेही आहेत जिथे पुरुषांना महिलांचे रूप धारण करून जावे लागते. महिलांचे रूप धारणे करणे म्हणजे केवळ महिलांचे कपडे घालणे नाहीतर महिलांसारखा पूर्ण श्रॄंगार करून त्या मंदिरात जावे लागते.

अशाप्रकारे देवीची पूजा करण्याची परंपरा केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टनकुलंगरा श्रीदेवी मंदिरात अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वर्षी या मंदिरात एक उत्सव आयोजित केला जातो. या मंदिरात पूजा करण्याआधी पुरूषांना महिलांप्रमाणे साज श्रॄंगार करणे आवश्यक आहे.

प्रत्येक वर्षी २३ आणि २४ मार्चला कोट्टनकुलंगरा श्रीदेवी मंदिरमध्ये चाम्याविलक्कू उत्सव साजरा केला जातो. या अनोख्या उत्सवात पुरूषही महिलांसारखे सजून देवीची आराधना करतात. साज श्रृंगार करून पुरूष चांगली नोकरी, आयोग्य आणि परिवाराच्या आनंदासाठी प्रार्थना करतात. या खास प्रकारच्या पूजेमुळे हा उत्सव सा-या जगात प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे की या मंदिरात देवीची मूर्ती स्वत: प्रकट झाली. सर्वात खास गोष्ट म्हणजे हे या राज्यातील असे एकमात्र मंदिर आहे ज्याच्या गर्भगृहाच्यावर छतावर कलश नाही. असे सांगितले जाते की, येथे काही पुरूषांनी महिलांप्रमाणे एका दगडावर फूल अर्पण केले होते. त्यानंतर दगडातून दिव्य शक्ती निघाली होती. त्यानंतर या मंदिराला रूप दिले गेले.

Leave a Comment