यंदाही लग्नाळूंनी चोरल्या गणेशमूर्ती

idols
बुंदेलखंडात वर्षानुवर्षे सुरू असलेली गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही पाळली गेली व गणेश विसर्जनाच्या दिवशी यंदाही मोठ्या संख्येने गणेशमूर्तींची चोरी केली गेली. विशेष म्हणजे पूर्वी केवळ बुंदेलखंडातील ग्रामीण भागात पाळली जाणारी ही प्रथा आता शहरी भागातही पसरली आहे. लग्नाळू तरूण तरूणी गणेशाची विसर्जनासाठी आणलेली मूर्ती विसर्जनापूर्वीच चोरी करून घरी नेतात, त्याची विधीवत पूजा करतात व लग्न झाले की मगच मूर्तीचे विसर्जन करतात अशी ही प्रथा आहे.

या भागात असा समज आहे की विसर्जनापूर्वीच गणेश मूर्ती चोरून आणून तिला लग्न झाल्याशिवाय विसर्जन करणार नाही असे म्हणून पुजले जाते. विशेषतः ज्या घरात लग्नाचे मुलगा मुलगी आहेत व ज्यांचे विवाह ठरण्यात अडचणी आहेत ती कुटुंबे हा मार्ग स्वीकारतात. यात उपवर मुलामुलींचे आईवडीलही सहभागी असतात. अनेकदा विसर्जन घाटावरून तसेच गणेशमंडळांच्या मांडवातून पुजेसाठी आणलेली मूर्तीही चोरून नेली जाते. गणेश हा सिद्धीदाता व रिद्धीसिद्धीचा स्वामी आहे व त्यामुळे तो आपल्या मनोकामना पूर्ण करतो हा भाविकांचा अढळ विश्वास आहे. ही परंपरा बुंदेलखंडात फार जुनी आहे व अशी मूर्ती चोरून आणली गेली की पुढील गणेशचतुर्थीपूर्वीच घरात सनई चौघडे वाजल्याचा अनुभवही खूप लोक सांगतात.

Leave a Comment