फेसबुक न्यू मेक्‍सिकोच्या गावात उभारणार नवे डेटा सेंटर

facebook
कॅलिफोर्निया – आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने न्यू मेक्‍सिकोमधील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

एक वर्षापूर्वी या संदर्भात फेसबुकच्या आधिकाऱ्यांची मेक्‍सिकोचे गर्व्हनर सुसना मार्टिनेझ यांच्यासोबत एक बैठक झाली होती. याबाबत बोलताना मार्टिनेझ म्हणाल्या, या गावात उत्साहात हे डेटा सेंटर सुरू झाल्याने पुन्हा एकदा स्पर्धा सुरू होत असण भविष्यात मेक्‍सिकोच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ही चांगली योजना आहे. न्यू मेक्‍सिको मधील सर्व राजकीय नेते तसेच लॉस लुनास प्रांतातील स्थानिक नेते यांनी या प्रकल्पाची मागणी लावून धरल्याने कर आकरणी विषयी निश्‍चित धोरण ठरवता आले.

डेटा सेंटर सुरू करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे क्‍लाऊड कम्प्युटिंगद्वारे आर्थिक भरभराट करणे. मात्र यामध्ये स्थानिकांचे प्रमाण कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, या बांधकामासाठी सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असून, या डेटा सेंटरच्या उभारणीसाठी १.८ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या तात्पुरत्या कामासाठी 300 जणांना तर ५० जणांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होणार आहे. या डेटा सेंटरची उभारणीचे पुढील महिन्यात सुरू होणार असून प्रत्यक्ष ऑनलाइन कामाची सुरवात २०१८ पर्यंत सुरू होईल.

Leave a Comment