जिओचा स्वस्त ब्रॅाडबँडही माजविणार खळबळ

jior
रिलायन्स जिओच्या फोर जी स्वस्त प्लानमुळे टेलिकॉम क्षेत्रात उठलेले वादळ शमण्यापूर्वीच जिओच्या स्वस्त ब्रॉडबॅडचा धमाका गाजू लागला आहे. फोन रडारच्या रिपोर्टनुसार जिओचे ब्रॉडबँड दर लिक झाले आहेत. या गिगा फायबर प्लॅनच्या चाचण्या सुरू आहेत व लवकरच हा प्लान बाजारात दाखल होईल असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रॉडबँडसाठी जिओ सिल्व्हर, गोल्ड व प्लॅटिनम ऑप्शन देणार आहे. हे प्लान ५०० रूपयांपासून सुरू होत आहेत. बेस प्लान ९० दिवसांसाठी १०० जीबी डेटा फ्री असा आहे. याच्या माध्यमातून जिओ टिव्ही, जिओ सिनेमा व बिटस अशी जिओ अॅप्सही अॅक्सेस करता येणार आहेत.

जिओचे ब्रॉडबँड प्लान्स स्पीड, डेटा व स्पेशल ब्रॉडबँड या कॅटेगरीत दिले जाणार आहेत. स्पीड आधारित प्लानसाठी टेरिफ ५० ते ६००० एमबीपीएस दरम्यान असेल व ते ३० दिवसासाठी असेल. ५० साठी २ हजार जीबी डेटासाठी १५०० रूपये आकारले जातील. डेटा आधारित प्लानसाठी ५ ते ६० जीबी डेटा १ महिना मुदत, स्पीड लिमीट नाही व बेसिक ५ जीबी साठी १००० रूपये असे दर असतील तर ८०० रूपयांच्या स्पेशल प्लानसाठी १० एमबीपीएस स्पीडने १ महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल.