अमेरिकेत सॅमसंगची नाचक्की

samsung1
न्यूयॉर्क- बॅटरीचा स्फोट होणे आणि पेट घेण्याच्या तक्रारीत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्यानंतर अमेरिकेत १० लाख सॅमसंग गॅलक्सी नोट सेव्हन हॅंडसेट परत मागविण्यात आले आहेत.

हे मोबाईल हॅंडसेट अमेरिकेमध्ये परत मागविण्यात आल्यामुळे किमान दहा देशांमधून मोबाइल परत मागवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने हा निर्णय मोबाइलचा आपोआप स्फोट होण्याच्या आतापर्यंत ९२ तक्रारी आल्यानंतर घेतला आहे. त्यापैकी २६ जणांना भाजल्याचीही तक्रार आहे. तर ५५ वेळा प्रॉपर्टीचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत तुम्हाला नवीन हॅंडसेट मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरे हॅंडसेट दिले जाईल अशी घोषणा कंपनीने केली. परंतु जोपर्यंत नवीन हॅंडसेट मिळणार नाहीत तोपर्यंत आम्हाला दुसरे काहीही नको म्हणत ग्राहकांनी ही ऑफर धुडकावून लावली. अॅपलचा आयफोन सेव्हन लाँच होणार म्हणून सॅमसंगने गॅलक्सी नोट सेव्हन हा फ्लॅगशिप मोबाइल बाजारात घाईघाईत आणला परंतु आता गॅलक्सी नोट सेव्हनचे स्फोट होऊ लागले असल्यामुळे सॅमसंग अडचणीत सापडले आहे.

Leave a Comment