पेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी

peru1
पेरू हे बहुगुणी व स्वस्त फळांतील एक फळ आहे. पेरूसेवनाचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र पेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी व लाभदायक असल्याचे आयुर्वेद सांगतो. या पानांचे अनेक उपयोग आहेत व माणसाच्या आरोग्यासाठी तसेच व्याधी निवारणासाठी ती वापरता येतात. या पानांमुळे अनेक आजारांवर अगदी सहज मात करता येते.

चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी या पानांची पेस्ट करून जेथे सुरकुत्या आहेत त्या भागात लावावी. कांही दिवसांतच सुरकुत्या कमी होऊ लागल्याचे दिसते. चेहर्‍यावरचे डाग कमी करण्यासाठी ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुतला तर डाग कमी होतात.

peru
दाताची दुखणी या पानांच्या काढ्याने कमी होतात. हिरड्यांची सूज व दातदुखीसाठी १५ ते २० कोवळी पाने कुस्करून पाण्यात उकळावी. पाणी निम्मे झाले की गार करावे व त्यात तुरटी व मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखी व हिरड्यांची सूज जाते. अर्धशिशी या प्रकारात सकाळपासून अर्धे मस्तक दुखते. हे दुखणे असह्य असते. अशा वेळी सूर्योदयापूर्वी कच्चा ताजा पेरू दगडाने रगडून तो लेप डोक्यावर लावल्याने अर्थशिशी बंद होते. पेरूची कोवळी पाने वाटून तो रस पाण्यासह प्यायला तर ताप कमी होतो. उलट्या होत असतील तर या पानांचा काढा प्यायल्यास उलटी बंद होते.

guava
मुरूमांसाठी पानांचा लेप चेहर्‍यावर लावावा. या पानांत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात व त्यामुळे मुरूमे जातात. तोंडाला वास येत असेल तर पेरूची पाने चावून थुंकावी. वास जातो. केस तेलकट अ्सतील तर पेरूची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुवावेत. जास्तीचे तेल निघून जाते व केस चमकदार दिसतात.

Leave a Comment