जिंदाल स्टीलमध्ये बुलेट ट्रेनसाठी हेड हार्ड रेल्सचे उत्पादन

jindal
जिंदल स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेडने मेट्रो तसेच हायस्पीड रेल्वेसाठी वापरल्या जाणार्‍या हेडहार्ड रेल्सचे उत्पादन सुरू केले असून जिंदल असे उत्पादन करणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. यासाठी कंपनीने रायगड मध्ये २०० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारला आहे.

कंपनीचे सीईओ रवी उप्पल या संदर्भात बोलताना म्हणाले, जर्मनीतील एसएमएस मीर तंत्रमानाच्या सहकार्याने या प्रकल्पाची उभारणी केली गेली आहे. या प्रकल्पात दरमहिना ३० हजार टन रेल्स तयार होऊ शकतात. बुलेट, मेट्रो, हाय स्पीड फ्रेट कॉरिडॉरसाठी असे रेल्स आवश्यक असतात. विशेष हिट ट्रीटमेंटच्या सहाय्याने हे उत्पादन केले जाते.त्यासाठी उच्च तापमान नियंत्रण करावे लागते. या पद्धतीने तयार केलेले हे रूळ सर्वसामान्य रूळांच्या तुलनेत ५० टक्के अधिक बळकट अ्रसतात.

Leave a Comment