आयफोन सिक्स च्या किंमती २२ हजारांनी उतरल्या

phon
अॅपलने भारतात आयफोन सिक्स एस व प्लसच्या किंमती २२ हजारांनी उतरविल्या असून अॅपलची भारतातील ही सर्वात मोठी दरकपात असल्याचे सांगितले जाते. आयफोन सेव्हन भारतात ७ आक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. त्याचे प्री बुकींगही सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दरकपात केली गेल्याचे समजते. आयफोन सेव्हनच्या ३२ जीबी व्हर्जनासाठी ६० हजार, १२८ जीबी साठी ७० हजार तर २५६ जीबी साठी ८० हजार रूपये मोजावे लागणार आहेत. प्लससाठी या किमती अनुक्रमे ७२ हजार, ८२ हजाार व ९२ हजार रूपये आहेत.

यापूर्वी भारतात आयफोन सिक्स एसच्या १२८ जीबी व्हर्जनसाठी ८२ हजार रूपये मोजावे लागत होते तो फोन आता ६० हजारात मिळणार आहे. सिक्स एस मोठा स्क्रीन पल्ससाठी १२८ जीबी व्हर्जनला ७० हजार रूपये मोजावे लागतील. चार इंचीआयफोन एसईची किमत ६४ जीबी साठी ४९ हजारांवरून ४४ हजारांवर आणली गेली आहे.

Leave a Comment