यंदाचा अर्थसंकल्प ३१ जानेवारीला?

bujet
केंद्र सरकारने रेल्वे व सार्वजनिक अर्थसंकल्प यापुढे वेगळे सादर न करता एकत्रच सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ जानेवारीपासून सुरू करण्याबाबत विचार चालविला असल्याचे समजते. या अधिवेशनात ३१ जानेवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल व रेल्वेसाठी वेगळे बजेट सादर केले जाणार नाही असेही सांगितले जात आहे.

अर्थसंकल्पासंदर्भात यंदा केले जाणारे बदल पुढच्या वर्षात नियमात बदलले जातील असेही वित्त मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे. बजेट प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत. आजपर्यंतच्या नियमानुसार फेब्रुवारीच्या तिसर्‍या अथवा चौथ्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू केले जात असे. त्यात प्रथम रेल्वे व नंतर आम बजेट पेश होत असे. यंदा मात्र हे सत्र २४ जानेवारीपासून सुरू होईल व ३१ जानेवारीला एकच बजेट सादर होईल असे संकेत दिले गेले आहेत.

जीएसटी पास करून घेण्यासाठी यंदा हिवाळी अधिवेशनही १२ नोव्हेंबरपासूनच भरविले जाईल असेही कांही सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Leave a Comment