बुरखाधारी इमोजी

nakab
जर्मनीतील सौदी वंशाच्या १५ वर्षीय मुलीने बुरखाधारी इमोजी तयार केली आहे. रौफ अल्हूंमेदी असे या मुलीचे नाव आहे. युरेापमध्ये सध्या बुरखा, हिजाब संदर्भात अनेक प्रकारचे वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही इमोजी विशेष महत्त्वाची ठरली असून रौफने ही इमोजी मंजुरीसाठी युनीकोड कंसोर्टियम कडे पाठविली आहे. या इमोजीला मंजुरी मिळाली तर २०१७ पासून ती वापरता येऊ शकणार आहे.

युरोपात सध्या बुरखा व हिजाबवरून विविध वाद सुरू आहेत. युरोपातील धर्मस्वातंत्र्य, महिला समानता, धर्म निरपेक्ष परंपरा, आतंकवादाचा धोका असे अनेक मुद्दे या संदर्भाने चर्चेत आहेत. त्या दृष्टीने ही इमोजी विशेष संवेदनशील बनली आहे.

Leave a Comment