व्होल्व्होची नवी एसयूव्ही एक्ससी ९० टी एट लाँच

volvo
व्होल्व्होने त्यांची नवी एसयूव्ही एक्ससी ९० टी एट भारतात लाँच केली असून तिची दिल्लीतील एक्स शो रूम किंमत १ कोटी २५ लाख रूपये आहे. ही कार हायब्रिड इंजिनसह आहे. म्हणजेच तिला पेट्रोलसह इलेक्ट्रीक मोटरपण दिली गेली आहे. तीन डाईव्ह मोडमध्ये ही कार चालविता येईल. त्यात पेट्रोल, पेट्रोल इंजिन व इलेकट्रीक हायब्रिड मोटर काँबो व पूर्ण इलेक्ट्रीक असे मोडस आहेत. पूर्ण इलेक्ट्रीक मोडवर ही कार ४० किमी अंतर काटू शकेल.

या गाडीला ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी ५.६ सेकंद लागतात. कंपनीने ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वात लक्झरी एसयूव्ही असल्याचा दावा केला आहे. चालकाला कार चालविताना पुरेपूर आनंद मिळेल असेच तिचे डिझाईन आहे. आरामदायी प्रवासासाठी नाप्पा लेदरसीटस दिल्या गेल्या आहेत तसेच संगीतप्रेमींसाठी १९ स्पीकर्स दिले गेले आहेत. यामुळे चोहोबाजूनी येणार्‍या साऊंडचा अनुभव घेता येतो. ही कार सहा रंगात उपलब्ध आहे. कारमध्ये सुरक्षेची परेपूर तरतूद आहे. त्यासाठी क्रूज कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, फुल ऑटो ब्रेकींग, ब्लाईंड स्पॉट डिटेक्शन, रियर कोलिजन वॉर्निग, पार्क पायलट असिस्ट अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment