बीबियाणे कंपनी माँन्सांटोचे बेअर फार्मा कडून अधिग्रहण

monsa
जगातील सर्वात मोठी बि बियाणे कंपनी माँन्सांटो जर्मन फर्म बेअर ने ६६ अब्ज डॉलर्सला खरेदी केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बेअर ही फार्मास्युटिकल व केमिकल क्षेत्रातील कंपनी आहे. माँन्सांटो व्यवस्थापनाबरोबर बेअरने १२८ डॉलर्स प्रति शेअर दराने खरेदी करार केल्याचे समजते.

माँन्सांटो ही बी बियाणे क्षेत्रातील जगमान्य कंपनी भारतात बीटी कॉटन सीडस साठी प्रसिद्ध आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे पर्यंत या कंपनीचे कर्ज ९.३ अब्ज डॉलर्सवर गेले होते व तेव्हापासूनच बेअर व माँन्सांटोमध्ये खरेदी व्यवहाराबद्दलची बोलणी सुरू होती. २०१७ पर्यंत माँन्सांटोचे अधिग्रहण पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment