अब्जाधीश अनिल अंबानी यांची आर कॉम व एअरसेल यांचे विलीनीकरण झाल्याची घोषणा बुधवारी केली गेली. वायरलेस बिझिनेस क्षेत्रातील या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर नव्या कंपनीची संपत्ती ६५ हजार कोटींवर गेली आहे. व यामुळे ती देशातील सबस्क्रायबर बेसवरची तीन नंबरची कंपनी बनली आहे.
आरकॉम व एअरसेलचे विलीनीकरण
रिलायन्स जिओमुळे या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांपुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अत्यंत कमी दरात सेवा देण्याची जिओची घोषणा अन्य कंपन्यांसाठी नुकसानीची ठरते आहे. या पार्श्वभूमीवर आर कॉम व एअरसेलचे विलीनीकरण हे महत्त्वाचे ठरल्याचे तज्ञांचे मत आहे. देशातील दूरसंचार क्षेत्रातील हा सर्वात मोठा सौदा ठरला आहे. नव्या कंपनीवर आता २८ हजार कोटींचे कर्ज आहे. मात्र या विलीनीकरणामुळे आरकॉमचे कर्ज २० हजार कोटींनी कमी होण्यास मदत मिळाली आहे.