पतंजलीचे सीईओ बाळकृष्ण २५ हजार कोटींचे धनी

balkrushn
पतंजलीचे सीईओ बाळकृष्ण यांची देशातील पंचवीसाचे अतिश्रीमंत व्यक्ती म्हणून चीनच्या हुरेन मासिकात नोंद केली गेली आहे. या मासिकात दरवर्षी भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली जाते. यंदा अशा ३३९ श्रीमंतांची यादी या मासिकाने जाहीर केली असून त्यात प्रथम क्रमांकावर मुकेश अंबानी तर दुसर्‍या क्रमांकावर दिलीप संघवी आहेत.

या मासिकात देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतात पतंजलीच्या नफ्यात गेल्या तीन वर्षात २३३ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. एफएमसीजी ब्रँडमध्ये पतंजली सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ब्रँड ठरला आहे. बाळकृष्ण हे मूळचे नेपाळचे असून या कंपनीचे ९४ टक्के शेअर्स त्यांच्या मालकीचे आहेत. कंपनीची उलाढाल ५ हजार कोटींवर गेली आहे व ती २०१७ पर्यंत १० हजार कोटींवर जाण्याचे अंदाजही व्यक्त केले जात आहेत.

१९९५ पासून बाळकृष्ण रामदेवबाबांचे गुरू शंकरदेव यांच्या आश्रमात दिव्य फार्मसी चालवित आहेत त्याचे रजिस्ट्रेशनही केले गेले आहे. बाळकृष्ण यांनी वाराणसीत शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते मात्र २०११ साली सीबीआयने त्यांना खोटी कागदपत्रे बनवून पारपत्र मिळविल्याचा आरोप करून त्यांची दोन वर्षे तपासणी केली होती. शेवटी तपासातून काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना क्लिनचिट दिली गेली होती. या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर म्हणून योगगुरू रामदेवबाबा काम करत आहेत.

Leave a Comment