आयफोन ७ जागवणार लहानपणीच्या आठवणी

super
मुंबई – अॅपल युझर्सना आयफोन ७ आणि अॅपलचे स्मार्टवॉच २ सोबत आता लहानपणी प्रत्येकाने खेळलेला सुपर मारियो हा गेम देखील मिळणार असल्यामुळे आता युझर्सना सुपर मारियोचे देखील खास आकर्षण असणार आहे. हा गेम आयओएस १० मध्ये एका नवीन अवतारात भेटीला येणार आहे. सध्या फक्त आयफोन यूझर्सनाच सुपर मारियो रन या नावाने लाँच झालेला हा गेम उपलब्ध आहे. आयफोन ७ च्या लाँचवेळीच याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अँड्रॉईड यूझर्सनाही हा गेम लवकरच उपलब्ध होईल, असे निनटेंडो कंपनीने जाहीर केले आहे. मात्र प्ले स्टोअरमध्ये तो कधी येणार, याची माहिती नाही. तसेच ते पेड अॅप असणार आहे.

आयफोन ७ लाँच होतो, तोच आयफोन ८ बाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयफोन ८ पुढच्या वर्षी युझर्सच्या भेटीला येणार आहे. २०१७ च्या अखेरीस आयफोनची पुढची आवृत्ती येईल. सुपर मारियो ब्रदरर्स हा गेम १३ सप्टेंबर १९८५ रोजी रिलिज करण्यात आला होता. आयफोन ७ मुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. निनटेंडो याने मारियोला तयार केले आहे. निनटेंडो ही क्योटो आणि जपानची कंपनी आहे. मारियो या गेमचा इतिहास अधिक रोमांचक आहे. व्हिडिओ गेमच्या जगात मारियो हा गेम सर्वाधिक लोकप्रिय आहे. १९९० साली मुलांना मारियो मिकी माऊसपेक्षाही अधिक जवळचा वाटायचाया. तसेच २०१५ साली वर्ल्ड व्हिडिओ गेम हॉल ऑफ फेममध्ये मारियोला सहभागी करून घेतलं आहे.

Leave a Comment