अमेरिकेत चार कोटींहून अधिक जनता दरिद्री

garibi
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था व सुपर पॉवर मानल्या जाणार्‍या अमेरिकेत आज घडीला ४ कोटी ३० लाख नागरिक दारिद्रय रेषेखाली असल्याचे नुकतच्या झालेल्या जनगणना अहवालात नमूद केले गेले आहे. अर्थात गेल्या १६ वर्षात गरीबी दर घटत चालला असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.

आकडेवारीनुसार २०१५ मध्ये १३.५ टक्के नागरिक दारिद्रयरेषेखाली जगत होते ते प्रमाण त्याच्या आधीच्या वर्षात १४.७ टक्के इतके होते. २००८ सालाच्या आर्थिक मंदीनंतर दारिद्रय रेषेखाली जगत असलेल्यांची संख्या ३८ लाख होती. हाऊस वेज अॅन्ड मिन्स कमिटीचे अध्यक्ष केल्विन ब्राडी यांच्या मते हा अहवाल निराशाजनक आहे. कमी उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी अमेरिकन सरकार अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे मात्र तरीही इतक्या संख्येने लोक दरिद्री असावेत हे योग्य नाही.

Leave a Comment