ह्युंडाई ट्यूशाँचे फोटो लिक- पुण्यात होताहेत चाचण्या

hyundai
ह्युंडाईने त्यांच्या ट्यूशाँ या नव्या एसयूव्हीचे लॉचिंग आक्टोबरमध्ये करण्याची तयारी पूर्ण केली असतानाच या कारचे स्पाय कॅमेर्‍याने टिपलेले फोटो लीक झाले आहेत. सध्या या एसयूव्हीच्या पुण्यात चाचण्या सुरू आहेत. या स्पाय फोटोमुळे या कारसंदर्भातली बरीच नवी माहिती समोर आली आहे.

या एसयूव्हीसाठी नवीन २.० लिटर डिझेल इंजिन व सिक्स स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला गेला आहे. ट्यूशाँ भारतात २००५ साली प्रथम सादर केली गेली होती मात्र कारची किंमत जास्त असल्याने तिची म्हणावी तशी विक्री होऊ शकली नव्हती. आता नव्याने ही कार भारतात सादर केली जात आहे. सँटाफे व क्रेटा याच्या मधले हे मॉडेल आहे. कारची किमत अंदाजे १८ लाख असावी असे सांगितले जात असून या गाडीसाठी अत्याधुनिक फिचर्स दिले गेले आहेत. त्यात ऑटोनॉमस ब्रेकींग, ब्लाईंड स्पॉट असिस्ट, प्रोजेक्टर हेडलँप यांचा समावेश आहे.

Leave a Comment