नेक्सस हॅक करा आणि १ कोटी ३५ लाख मिळवा

nexus
वॉशिंग्टन: गूगलने नेक्ससचे ६ पी आणि ५ एक्स या मोबाईल हँडसेटसच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. हे हँडसेटस हॅक करणाऱ्यांना २ लाख डॉलर्स; अर्थात सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.

गूगलच्या या ‘प्रोजेक्ट झिरो सिक्युरिटी कॉन्टेस्ट’मध्ये १४ मार्च २०१७ पर्यंत स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी नेक्ससचे हँडसेट हॅक करून त्यावरील जीमेल अकाउंट अथवा एसएमएस मधील मजकूर खुला करून दाखवायचा आहे. मात्र त्यासाठी विशिष्ट प्रणालीच वापरण्याची मुभा असणार आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकाला २ लाख; द्वितीय क्रमांकाला १ लाख आणि तृतीय क्रमांकाला ५० हजार डॉलर्सचे बक्षीस गूगलने जाहीर केले आहे.

Leave a Comment