…तरच केवळ १७०० रूपयांमध्ये घेऊ शकाल आयफोन ७

iphone
मुंबई – आता भारतात लवकरच आयफोन ७ लॉन्च होणार असून या स्मार्टफोनबद्द्लची उत्सुकता आयफोन चाहत्यांमध्ये कमालीची बघायला मिळत आहे हा स्मार्टफोन बराच महागडा असल्याने प्रत्येकांना वाटत असूनही हा स्मार्टफोन घेता येत नाही. आयफोन ७ ची भारतात ६० हजार रूपये इतकी किंमत असणार आहे. मात्र, आयफोन घेऊ इच्छिणारा सर्वसामान्य चाहताही आता आयफोन घेऊ शकणार आहे.

जागरण डॉट कॉम वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही केवळ १७०० रूपयांमध्येच आयफोन ७ खरेदी करू शकता. भारतात या स्मार्टफोनची किंमत ६० हजार रूपये इतकी असणार आहे.याबद्दल भारतात आयफोनची मार्केटींग करणा-या कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप्पल आपल्या ग्राहकांसाठी भारतातील काही बॅंकासोबत अनुबंध केला आहे. जर हा अनुबंध सफल राहिला तर सर्वसामान्य ग्राहक केवळ १७०० रूपयांमध्ये आयफोन ७ खरेदी करू शकणार आहे.

Leave a Comment