जादूई मोटरसायकल टॉरस

bike
जिना चढेल, वाळूतून, चिखलातून धावू शकेल, जंगलातूनही जाईल व नेहमीच्या रस्त्यांवरही धावेल. शिवाय फोल्ड केली तर सुटकेसमध्येही सहज मावेल अशी मोटरसायकल असावी अशी कुणाची इच्छा असेल तर ती सहज पूर्ण होऊ शकणार आहे. कारण रशियातील मोटोव्हेझाडोई कंपनीने या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी मोटरसायकल तयार केली आहे. टॉरस असे तिचे नामकरण केले गेले आहे.

थोडकयात ही मोटरसायकल मनाल येईल तिथे चालविता येईल. खरे तर ही मोटरसायकल जंगल प्रवासासाठी बनविली गेली आहे. मात्र तिच्या अन्य गुणांमुळे तिची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. या बाईकला सिगल सिलेंडर चार स्ट्रोक इंजिन दिले गेले आहे. ती ताशी ६० किमी वेगाने धावू शकते. नेहमीच्या रस्त्यांप्रमाणेच ती जंगल, खडबडीत रस्ते अशी सर्वठिकाणी चालू शकते. या बाईकच्या दोन्ही चाकांना इंजिनमधून पॉवर मिळते व त्यामुळे ती चिखल अथवा वाळूत फसत नाही. ती वजनाला खूपच हलकी आहे त्यामुळे सहज उचलता येते व फोल्ड केली तर सुटकेसमध्ये मावू शकते. ही मोटरसायकल बर्‍यापैकी वजन वाहून नेऊ शकते.

या बाईकच्या किमतीबाबत अद्यापी माहिती नसली तरी ती भारतात लवकरच दाखल होईल व येथे तिची किंमत ४० ते ७५ हजार रूपयांच्या दरम्यान असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment