जिओ टक्कर देण्यासाठी बीएसएनएल-वोडाफोनची हातमिळवणी

vodafone
नवी दिल्ली – अनेक दूरसंचार कंपन्यांनी ‘रिलायन्स जिओ’च्या दमदार प्रवेशानंतर आपल्या ग्राहकांना कायम ठेवणे आणि नवीन ग्राहकांना समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्राहकांना सुयोग्य कॉलिंग आणि डाटा सर्व्हिसेस देण्यासाठी नवीन योजना बीएसएनएल, वोडाफोन, एअरटेल, आयडिया यासारख्या कंपन्यांनी आणल्या आहेत. यानुसार, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि वोडाफोन इंडिया यांच्यात टू जी इंट्रा सर्कल रोमिंग पॅकबाबत एक करार झाला आहे. दोन्ही कंपन्या आपल्या टू-जी ग्राहकांना रोमिंगच्या दरम्यान एकमेकांचे नेटवर्कद्वारे कनेक्टिविटी देतील.

वोडाफोन कंपनीला टू जी नेटवर्क, प्रामुख्याने ग्रामीण भागात विस्तारास मदत मिळेल. तर बीएसएनएललाही आपले नेटवर्क मजबूत करता येईल. मुख्य म्हणजे देशभरात वोडाफोनचे १.३७ लाखांपेक्षा अधिक तर बीएसएनएलकडे १.१४ लाखांपेक्षा अधिक टॉवर आहेत, अशी माहिती वोडाफोन इंडियाच्या मुख्य अधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Comment