बाजारपेठेत दाखल झाला ‘लावा’चा पी ७ प्लस

lava
मुंबई – आयफोन ७ आणि आयफोन प्लस जागतिक स्तरावर दाखल झाल्यानंतर अनेक विदेशी कंपन्यांनी भारतातही आपले नवीन मोबाईल बाजारपेठेत आणले आहेत. स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लावा’ने आपला ‘पी ७ प्लस’ हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी नुकताच उपलब्ध करून दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ४४८९ रुपये ऐवढी आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा २.५ कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचे रिझॉल्युशन : ७००x१२८० पिक्सल एवढे आहे. यात १.३ गीगाहर्ट्झ क्वाड-कोरचा प्रोसेसर, १ जीबी रॅम, ऍन्ड्रॉईड ६.० ऑपरेटिंग सिस्टम,२८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment