आता ऐकताही येणार व्हॉट्सअॅपचे मेसेजेस !

whatsapp
नवी दिल्ली – सातत्याने नवनवीन कल्पना राबवून सोशल मेसेजिंगसाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप अप टू डेट राहत असते. व्हॉट्सअॅपने काही महिन्यापूर्वी संदेश पाठविण्याबरोबरच व्हाईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता व्हॉट्सअॅप एक पाऊल पुढे टाकत मेसेजेस वाचण्याबरोरच ऐकण्याची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.

व्हॉट्सअॅप कोणी पाठविलेला मजकूर ऐकण्यासाठी ‘स्पिक‘ नावाचे नवीन ऑप्शन असणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मजकूर ऐकता येणार आहे. आयफोन धारकांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. व्हॉट्सअॅपचा उपयोग ग्रुप चॅटींग अथवा वैयक्तीक चॅटींगसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नेटीझन्सची गरज व मागणी ओळखून व्हॉट्सअॅपकडून नवनवीन सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. यामुळेच या अॅपला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment