बीएमडब्ल्यूचा सर्वात मोठा रिकॉल

bmw
जर्मन कारमेकर कंपनी बीएमडब्ल्यूने जपानमध्ये त्यांच्या १लाख १० हजार कार्स रिकॉल केल्या असून खराब एअरबॅग्जमुळे हा रिकॉल करावा लागला असल्याचे समजते. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रिकॉल असून त्यामुळे ऑटो तज्ञही हैराण झाले आहेत. या रिकॉलमध्ये कंपनीने मॉडेल ११६ आय, ३२० आय सह अन्य ४४ मॉडेल्सच्या कार रिकॉल केल्या आहत.

या कारमधील पॅसेंजर साईडच्या एअरबॅग्ज दोषपूर्ण असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. टकाता कॉर्पने या एअरबॅग्ज बनविल्या आहेत. रिकॉल करण्यात आलेल्या कार्स २००४ ते २०१२ या काळातील असून टकागा एअरबॅग्जचा वापर असलेल्या कार्सच्या अपघातात गतवर्षी जगात १४ जण मृत्यमुखी पडले आहेत तर १५० लोक जखमी झाले अ्रसल्याचेही समजते. जपानच्या परिवहन मंत्रालयाने टकाता एअरबॅग्जचा वापर असलेल्या ७० लाख कार्स रिकॉल करण्याचा आदेश बीएमडब्ल्यूला दिला होता व त्यासाठी २०१९ ची मुदत दिली होती. अमेरिकन परिवहन मंत्रालयानेही खराब एअरबॅग्ज संदर्भात बीएमडब्ल्यूला नोटिस दिली होती.

Leave a Comment