सॅमसंगचा ३१८ तास स्टँडबायसह गॅलेक्सी फोल्डर टू लाँच

folder
गेल्या महिन्यापासून अनेक फोटो लिक झालेला सॅमसंगचा गॅलॅक्सी फोल्डर टू स्मार्टफोन लाँच झाला आहे. या फ्लिपफोनसाठी अँड्राईड ६.० मार्शमेलो ओएस दिली गेली आहे. चीनच्या वेबसाईटवर हा फोन लिस्ट झाला आहे मात्र त्याची किंमत जाहीर केली गेलेली नाही. तसेच भारतात हा फोन कधी येणार त्याचीही माहिती दिली गेलेली नाही.

अन्य फिचर्समध्ये २ जीबी रॅम, ३.८ इंची डब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ती १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ८ एमपीचा रिअर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी १९५० एमएमएच ची असून तिचा स्टँडबाय टाईम ३१८ तासांचा असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फोर जी फोन असून त्याला जीपीएस, ब्ल्यू टूथ व्ही ४.२, वायफाय अशी अन्य कनेक्टिव्हीटी ऑप्शन्सही आहेत.

Leave a Comment