मोबाइलसोबतच वेबसाइटवर देखील फेसबुकचे ‘अॅप मोमेंट्स’

facebook1
मुंबई: आता मोबाइलसोबतच वेबसाइटवर फेसबुकचे फोटो शेअरिंग ‘अॅप मोमेंट्स’ देखील उपलब्ध होणार असल्यामुळे यूजर्स आपल्या अब्लमची लिंक शेअर करु शकणार आहे.

याबाबत तंत्रविज्ञान वेबसाइट टेकक्रंच डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, पहिले हे अॅप फारच मर्यादित होते. फक्त फेसबुक मित्रांसोबतच फोटो शेअर करता येत होते. पण आता जे फेसबुवर नाहीत त्यांनाही वेबलिंकवरुन अल्बममधील फोटो पाहता येणार आहेत. या फीचरचा वापर करुन यूजर्स आपले जुने अल्बमही शेअर करु शकतात. त्यासाठी आपल्या मोबाइलच स्क्रिनच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तीन बिंदूंवर क्लिक करायचे आहे. जिथे त्यांना लिंक शेअर हा ऑप्शन दिसेल. या नव्या ऑप्शनमुळे तुम्हाला यूएलआर मिळेल. ती यूएलआर तुम्ही ईमेल आमि मेसेजही करु शकता. अॅपमधील हे फीचर जास्त रेझ्युलेशन असणाऱ्या फोटोलाही सपोर्ट करेल.

Leave a Comment