मिस युनिव्हर्ससाठी रोश्मिता हरिमूर्ती भारताची प्रतिनिधी

rosh
यंदाच्या मिस युनिव्हर्स म्हणजे जगतसुंदरी स्पर्धेसाठी बंगलोरची रोश्मिता हरिमूर्ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामाहा फॅसिनो मिस दिवा २०१६ हा किताब तिने नुकताच जिंकल्यानंतर मिस युनिव्हर्ससाठी तिची निवड झाली आहे. ही स्पर्धा २०१७ च्या सुरवातीला होणार आहे. यामाहा फॅसिनो मिस दिवासाठी मॉडेल व अभिनेत्री लारा दत्त, अर्जुन रामपाल, अभिनेता अभय देओल, अभिनेत्री आदिती राव हैदरी व डिझायनर गौरव गुप्ता यांनी जज म्हणून काम पाहिले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनेत्री परिणिती चोप्रा सह अन्य अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला होता.

२२ वर्षीय रोश्मिताने बिझिनेस मास्टर्स डिग्री घेतली असून मिस वर्ल्ड स्पर्धेच्या तयारीला ती लवकरच सुरवात करणार आहे. या स्पर्धेचा अनुभव न विसरता येणारा होता असेही ती म्हणाली. ही स्पर्धा २००० साली लारा दत्तने जिंकली होती त्यानंतर हा ताज अद्यापी भारताला मिळवता आलेला नाही. या स्पर्धेसाठी देशभरातील १६ स्पर्धक होते. त्यात श्रीनिधी शेट्टीही पहिली तर आराधना बोर्गोहेन ही दुसरी रनरअप ठरली.

Leave a Comment