‘फेसबुक’ला दाखवली चूक; नाशिकचा तरूण लखपती

facebook
येवला: सोशल मीडियात आघाडीवर असलेले फेसबूक नाशिक जिल्ह्यातील एका तरूणावर चांगलेच फिदा झाले असून फेसबुकने या तरूणाच्या कामगिरीवर खूश होऊन त्याला थोडे थोडके नव्हे तर चक्क १० लाख रूपयांचे बक्षिस दिले. योगेश तंटक असे या तरुणाचे नाव असून, तो पेशाने इंजिनीअर आहे. येथील योगेशने फेसबुकला एक तांत्रिक चूक दाखवून दिल्यामुळे खूश होऊन फेसबुकने त्याला इतकी गलेलठ्ठ रक्कम दिली.

सध्या पुण्यातील एका संगणक कंपनीत योगेश तंटक हा काम करतो. तो मुळचा नाशिक जिल्हयातील येवला येथील रहिवासी आहे. फेसबुकला केवळ सोशल मीडिया म्हणून त्याने पाहिले नाही. तर त्याकडे बारीक लक्ष दिले. मुळातच अभ्यासू असलेल्या योगेशच्या फेसबुकची एक त्रूटी लक्षात आली. त्याने जी फेसबुकच्या निदर्शनास आणून दिली. ती त्रूटी अशी होतील की, फेसबुकवर इव्हेंट या पर्यायात वापरकर्त्याने एखादा कार्यक्रम टाकला तर ती पोस्ट सुरक्षित राहत नव्हती. शिवाय अशा फेसबुक खात्याची इतर माहिती कोणाही वापरकर्त्याला मिळू शकत होती. याद्वारे कोणाचेही खाते वापरले जाणे सोपे बनत होते. विशेष म्हणजे मूळ फेसबुक खातेधारकाला याचा पत्ता देखील लागत नव्हता. ही त्रूटी लक्षात येताच योगेशने त्याकडे दूर्लक्ष केले नाही. तर त्याने ती त्रूटी फेसबुक टीमच्या लक्षात आणून दिली. तसेच, त्याचा थेट सादरिकरणही (डेमो) करून दाखवले.

योगेशने सादरिकरण दाखवले म्हणून काही फेसबुकने त्यावर लगेच विश्वास नाही ठेवला. तर तो डेमो आणि फेसबुकची त्रूटी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला. काही काळ अभ्यासही केला. त्रुटीतील सत्यता लक्षात येताच फेसबुकने योगेशला १५ दिवसांचा अवधी मागितला. तसा संदेशही योगेशला पाठवला. त्यानंतर केलेल्या अधिकच्या अभ्यासात फेसबुकच्या लक्षात आले की, ही त्रुटी अॅन्ड्रॉईड सिस्टीमला सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका आहे. फेसबुकने ही त्रुटी गांभिर्याने घेतली. त्यात दुरूस्ती केली. त्यानंतर दुरूस्तीच्या सुरक्षेची महिनाभर खात्रीही केली. खात्री होताच फेसबुकने योगेशचे अभिनंदन केले.

Leave a Comment