तपेश्वरम मध्ये बनतोय जगातील मोठा गणेश प्रसाद लाडू

laddu
आंध्र प्रदेशातील विजिग जिल्ह्यातील तपेश्वरम हलवाई केंद्रात यंदा जगातील सर्वात मोठा लाडू बनविण्याचे काम सुरू असून तब्बल २९.५ टन म्हणजे सुमारे ३० हजार किलो वजनाचा हा लाडू असेल. दरवर्षीच येथे गणेशोत्सवात गणेशाला प्रसाद म्हणून प्रचंड आकाराचे लाडू बनविले जातात व वेगवेगळ्या गणेश मंडळांकडून त्यासाठी ऑर्डर येत असतात. हा लाडू नंतर प्रसाद म्हणून वाटला जातो.

यंदाचा लाडू बनविण्याची प्रक्रिया गणेशचतुर्थीपासूनच सुरू झाली आहे. हा लाडू लवकरच पूर्ण होईल तेव्हा गिनिज बुकमध्ये त्याची नोंद केली जाईल असे समजते. २०१० पासून लाडू चे वजन दरवर्षी वाढत चालले आहे. हा लाडू कसा बनविला जातो त्याची प्रक्रिया दाखविणारी डॉक्युमेंटरीही यापूर्वीच प्रकाशित केली गेली आहे. महा गणपती महा नैवेद्यम या नावाने ही फिल्म तयार केली गेली होती.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह न वापरताही हा लाड सहा महिने ताजा राहतो. हरबरा डाळ, तूप, साखर, वेलदोडे, काजू, बदाम, कापूर अशा पदार्थांचा वापर त्यासाठी केला जातो.

Leave a Comment