‘जिओ’ टक्कर देण्यासाठी रिलायन्सची जबरदस्त ऑफर

reliance
मुंबई : रिलायंस जियोच्या भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली असून टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपले स्थान कायम ठेवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियो इंफोकॉमला टक्कर देण्यासाठी भाऊ अनिल अंबानी देखील मैदानात उतरले आहेत.

एक शानदार आणि स्वस्त ऑफर आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन जाहीर केली असून रिलायंस कम्यूनिकेशन आपल्या प्रीपेड जीएसएम यूजर्ससाठी एक विशेष ऑफर दिली आहे. ४० रुपयांच्या रिचार्जमध्ये ४० रुपये फुल टॉकटाइम आणि १ जीबी इंटरनेट डाटा देखील कंपनी फ्रीमध्ये देत आहे.

Leave a Comment