आयआरसीटीसीच्या श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया टूरचे बुकींग सुरू

shrilanka
इंडियन रेल्वेच्या केटरिंग अॅन्ड टूरिझम विभागाने म्हणजेच आयआरसीटीसीने देशाबरोबरच परदेशातही पर्यटन सुविधा सुरू केली असून सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका या देशांसाठी आंतरराष्ट्रीय पॅकेज सादर केली आहेत. पर्यटक दिल्लीपासून या पर्यटन सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या प्रवासात व्हिजा, विमानप्रवास, भोजन, निवास व पर्यटन स्थळांची सफ असे सर्व खर्च अंतर्भूत आहेत. तसेच पर्यटकांसोबत कंपनीचा अनुभवी टूर मॅनेजरही असणार आहे.

निसर्गप्रेमींसाठी श्रीलंकेची टूर अविस्मरणीय ठरेल कारण रामायण थीमवर ही टूर बेतली गेली आहे. त्यात अशोक वाटिका, सीता, हनुमान, अंजनायक, बिभिषण, मुनावरी मुइश्वरम शिवमंदिर अशी अनेक प्रसिद्ध मंदिरे दाखविली जाणार आहेत. पाच रात्री आणि सहा दिवस असा प्रवासाचा काल आहे. यासोबत श्रीलंकेतील अन्य प्रसिद्ध पर्यटनस्थळेही पर्यटकांना दाखविली जाणार आहेत.

सिंगापूर मलेशियासाठीही पाच रात्री व सहा दिवस असाच प्रवासाचा कालावधी आहे. यात तीन दिवस सिंगापूर मध्ये स्टे असून त्यात नाईट सफारी, सिंगापूर फ्लायर, सिटी टूर, सँटोरा आयलंडचा समावेश आहे तर मलेशियात बाटू केव्हज, गेंटिग हायलंड, स्नोवर्ल्ड पर्यटकांना पाहता येणार आहे.

Leave a Comment