भारतात एअरटेलचे सर्वाधिक ग्राहक

airtel
नवी दिल्ली : तब्बल १०३.५ कोटी नागरिक भारतामध्ये मोबाईल वापरत आहेत. जून महिन्यापर्यंतची देशातील मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती ट्रायने प्रसिद्ध केली आहे. जून महिन्यापर्यंत भारतात मोबाईल आणि लँडलाईन वापरणारे एकूण १०५.९८ कोटी नागरिक आहेत. मे २०१६ मध्ये हीच संख्या १०५.८ कोटी इतकी होती.

याबाबत ट्रायने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ८३.२० टक्के फोन कनेक्शन आहेत. मे मध्ये हीच संख्या ८३.१४ टक्के होती. मे महिन्यामध्ये १०३.३ कोटी असलेले मोबाईल ग्राहक जूनमध्ये १०३.५ कोटी आहेत. मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असली तरी लँडलाईन ग्राहकांची संख्या मात्र कमी झाली आहे. मे मध्ये २.४८ कोटी असणारे लँडलाईन ग्राहक जूनमध्ये २.४७कोटी आहेत.

मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नजर टाकली तर एअरटेलच्या ग्राहकांमध्ये १४ लाखांची वाढ होऊन एकूण संख्या २५.५७ कोटी झाली आहे. या यादीमध्ये एअरटेलचपहिल्या क्रमांकावर असून या यादीनुसार व्होडाफोनचे १९.९४ कोटी तर आयडियाचे १७.६२ कोटी ग्राहक आहेत. बीएसएनएलकडे एकूण ८.९५ कोटी ग्राहक आहेत.