बाजारात लवकरच दाखल होणार विंडोज १० असलेला स्मार्टफोन

alcatel
नवी दिल्ली : लवकरच आपल्या ग्राहकांसाठी नवा आयडॉल ४ प्रो हा विंडोज १० या ऑपरेटिंग सिस्टिमचा नवा स्मार्टफोन चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अल्काटेल लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनेलचे फोटो सादर केले असून या स्मार्टफोनच्या लाँचिंगविषयी आणि किंमतीविषयी सध्यातरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आयपीएस एचडी डिस्प्ले, ड्रगनट्रेल ग्लास प्रोटेक्शन, २.१५ GHz क्वॉड कोर कॉम स्नॅपड्रगन ८२०चा प्रोसेसर त्याचबरोबर यात विंडोज १० एनिव्हर्सरी एडिशन ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात येणार आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, २१ मेगापिक्सलचा रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment