फ्लिपकार्टमध्ये तब्बल १० हजार जागांसाठी भरती

flipkart
नवी दिल्ली – ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट ही कंपनी सणा-सुदीच्या काळात १० हजार कामगारांची भरती करणार आहे. सणा-सुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात, त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार योग्य वेळेत सेवा पुरवता यावी यासाठी लॉजिस्टीक आणि डिलीव्हरीसाठी कामगारांची भरती करण्याचा निर्णय फ्लिपकार्टने घेतला आहे.

फ्लिपकार्टकडून येत्या काळातील सण-उत्सवांमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. यामुळे साहजिकच ग्राहकांची मागणीही वाढणार आहे, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना तात्काळ सेवा पुरविण्यात यावी यासाठी फ्लिपकार्टने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया कंत्राटी स्वरुपात असणार आहे.

फ्लिपकार्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी नितीन सेठ यांनी सांगितले की, फेस्टिव्हल सीजन सुरु होणार आहे, यंदाच्या ऑफर्स आणि सेल या गेल्यावर्षीच्या तुलनेत आणखीन मोठ्या आणि चांगल्या असतील. डिलिव्हरी मॉडल मजबूत बनविण्यासाठी आम्ही लॉजिस्टिक्स विभागात १० हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्याच्या तयारीत आहोत. ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात होणार आहे.

Leave a Comment