आता रामदेव बाबांच्या स्वदेशी जीन्स

ramdev-baba
नवी दिल्ली – बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून आता गारमेंटच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले असून बाबा रामदेव यांनी तरुणांची चॉईस पाहत जीन्स पॅन्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने घेतला आहे. आयुर्वेदिक, आरोग्य, किराणा, कॉस्मेटिकनंतर आता योगगुरु फॅशन इंडस्ट्रीत पतंजली देसी आव्हान निर्माण करेल असे दिसत आहे. पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी १० प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्री-पुरुषांच्या कपड्याची निर्मिती केली जाणार आहे. जीन्सबरोबर कार्यालयीन कामकाजात वापरण्यात येणारे कपडेही सादर करण्यात येणार आहेत. वस्रोद्योगाच्या उत्पादनाची सुरुवात जीन्सच्या निर्मितीने केली जाणार आहे.

नागपूर येथे मिहान प्रकल्पात पतंजली फूड अँड हर्बल पार्क २३० एकरात उभारण्यात येत आहे. त्यात १६०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून देश-विदेशात उत्पादनांची निर्यात केली जाणार आहे. आगामी दोन वर्षात पतंजली ट्रस्ट नव्या उद्योगाच्या माध्यमातून ५० कोटींची उलाढाल करण्याचा मानस आहे. यामध्ये स्वदेशी शूज बाजारात आणण्याचा विचार असल्याचेही कळत आहे.

Leave a Comment