हज यात्रेसाठी २० लाख यात्रेकरू मककेत दाखल

hajj
हज यात्रेसाठी यंदा पहिल्या टप्प्यात जगभरातून २० लाखांहून अधिक यात्रेकरू मक्केत दाखल झाले आहेत. गतवर्षी यात्रेंत चेंगराचेंगरीमुळे २३०० यात्रेकरूंना प्राण गमावण्याची पाळी आली होती हे लक्षात घेऊन सौदी सरकारने यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था ठेवली असल्याचे सांगितले जात आहे.

गतवर्षीच्या चेंगराचेंगरीत इराणचे सर्वाधिक यात्रेकरू मरण पावले होते त्यावरून इराण व सौदीचे संबंध ताणले गेले आहेत. ३० वर्षांनंतर यंदा प्रथमच इराण ने त्यांच्या नागरिकांना हाजसाठी परवानगी दिलेली नाही. शनिवारपासूनच येथील यात्रेचे रितो सुरू झाले आहेत. अनेकांनी काबची प्रदक्षिणाही सुरू केली आहे. यात्रेसाठी आणखीही यात्रेकरू येतच आहेत. इस्लाममधील पाच प्रमुख स्तंभात हाज यात्रेचा समावेश होतो.हाज यात्रा हे प्रत्येक मुस्लीमाचे कर्तव्य मानले गेले आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणार्याक प्रत्येक मुस्लीमाने आयुष्यात एकदा तरी ही या करायला हवी असे इस्लाम सांगतो.

Leave a Comment