राजधानी दिल्लीत सर्वात जास्त पगाराच्या नोकऱ्या

salary
नवी दिल्ली : चांगली नोकरी आणि त्यातच चांगला पगाराची सर्वसामान्यांना विशेष अशी गरज असतेच. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची आठवण जास्त पगाराच्याबाबतीत आपल्याला सर्वात आधी येते. मात्र, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नव्हे तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये जास्त पगार मिळतो.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कर्मचा-यांना सर्वात जास्त पगार मिळतो. जरी मुंबईत कोटय़वधी रुपयांची उलाढाल सुरु असली तरी दिल्लीमध्ये कर्मचा-यांना सर्वाधिक पगार मिळत आहे. दिल्लीचे मागील वर्षाचे दरडोई उत्पन्न १,९२५८७ लाख एवढे होते. आता यामध्ये वाढ होऊन हा आकडा २,१९,९७९ लाख रुपयांवर पोहोचला आहे.

दिल्लीचे दरडोई उत्पन्न इतर शहरांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याने येथील कर्मचा-यांचे पगार इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहेत. येथे काम करणा-या कर्मचा-यांमध्ये जास्त पगार असल्याने त्यांच्या राहणीमानातही थोडाफार बदल आपल्याला जाणवतो.

Leave a Comment