भारतीय जवानांनी बनविला जागतिक विक्रम

indian-army
नवी दिल्ली – शुक्रवारी दुचाकीवरून सादर करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय लष्करातील दोन जवानांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून ही प्रात्यक्षिके जबलपूर येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरमध्ये करण्यात आली. दुचाकीच्या सीटवर आणि हँडलवर उभे राहून सर्वाधिक वेळ दुचाकी चालवण्याचा जागतिक विक्रम या जवानांनी रचला आहे. यापैकी कॅप्टन मनप्रित सिंग यांनी मोटारसायकलच्या सीटवर उभे राहून दोन तास २४ मिनिटे आणि १२ सेकंद इतक्या वेळात ७५.२ किलोमीटर एवढे अंतर पार केले. यापूर्वी हा विक्रम इंदौरच्या रत्नेश पांडे यांच्या नावावर होता. त्यांनी मोटारसायकवरच्या सीटवर उभे राहून ३२.३ किलोमीटर इतके अंतर पार केले होते.

याशिवाय, हवालदार संदीप कुमार यांनी मोटारसायकलच्या हँडलवर उभे राहून गाडी चालविण्याच्या प्रकारात एक तास २७ मिनिट आणि ३१ सेकंदात ४६.९ किलोमीटर एवढे अंतर पार केले. भारतीय लष्कराकडून यासंदर्भात निवेदन जारी करून माहिती देण्यात आलेली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लष्कराच्या जबलपूर येथील सिग्नल कॉर्पसमधील डेअरडेव्हिल्स टीमच्या जवानांनी हे जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Leave a Comment